Website Government Medical College
30 Duty Medical Officers required at Aurangabad.
Qualification:
BHMS/BAMS.
Salary:
BHMS – Rs. 30,000/-
BAMS – Rs. 35000/-
Last date to apply: 13th May 2020
To view the brochure, click here.
*कंत्राटी पदाची जाहिरात घाटीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध*
औरंगाबाद, दिनांक 7 (जिमाका): शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) औरंगाबादतर्फे कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी व कोरोना रोगाच्या कामासंदर्भात एकत्रित ठराविक वेतनावर कंत्राटी पद्धतीने विविध पदांची नियुक्ती करावयाची आहे . याकरिताची सविस्तर जाहिरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या संकेतस्थळावर www.gmcaurangabad.com प्रसिध्द करण्यात आलेली आहे. सदरील पदांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने विहित नमुन्यातील अर्जात सर्व कागदपत्रांसहित मेलद्वारे १३ मे २०२० पर्यंत सादर करावयाची आहेत, असे घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी कळवले आहे.
या जाहिराती अंतर्गत विविध फिजिशियन, डयूटी मेडिकल ऑफिसर ( DMO – MBBS / BAMS / BHMS ) , बधिरीकरण तज्ञ , चेस्ट फिजिशियन , इन्टेसीव्हीस्ट, बालरोग तज्ञ, शल्यचिकित्सक, कान, नाक-घसा तज्ञ, नेफ्रॉलॉजी परिचारिका अधिपरिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ , कर्मचारी, डेटा एंट्री ऑपरेटर नर्सिंग स्टाफ, सफाईगार इत्यादींची पदे प्रसिध्द करण्यात आली आहेत, असेही त्यांनी कळवले आहे.